भाजपकडून ३० ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर

20 Jan 2022 13:13:23
 
BJP
 
 
 
 
नवी दिल्ली : नुकत्याच घोषित झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून बुधवार, दि. १९ जानेवारी रोजी ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणीमंत्री, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय मुख्तार अब्बास नकवी यांचा यात समावेश आहे.
 
 
यासोबतच उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद यादव, दिनेश शर्मा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह, उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी राधामोहनसिंह, निवडणूक प्रभारी धर्मेंद्रप्रधान यांचाही या यादीत आहे. याशिवाय खासदार हेमामालिनी, संजीव बाल्यान, जसवंत सैनी, अशोक कटारिया, सुरेंद्र नागर, चौधरी भूपेंद्रसिंह, बी. एल. वर्मा, राजवीरसिंह, एस. पी. सिंह बघेल, साध्वी निरंजना ज्योती, कांता कदम, रजनीकांत माहेश्वरी, मोहित बेनीवाल, धर्मेंद्र कश्यप, जे. पी. एस राठोड आणि भोलासिंह खटिक यांचा ‘स्टार’ प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0