'मास्टर्स इन हिंदू स्टडीज'; हिंदू धर्माची शिकवण देणारा देशातील पहिला मास्टर्स कोर्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2022
Total Views |
hindu



बनारस -
वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाने (BHU) नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यांनी हिंदू धर्माची शिकवण देणारा मास्टर्स कोर्स सुरू केला आहे. या नवीन अभ्यासक्रमामुळे हे विद्यापीठ हिंदु धर्मावरील अभ्यासक्रम देणारे भारतातील पहिले विद्यापीठ बनले आहे.

'मास्टर्स इन हिंदू स्टडीज' हा एक आंतरविद्याशाखीय कार्यक्रम आहे, जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या अनुषंगाने तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम भारत अध्यायन केंद्र, तत्वज्ञान आणि धर्म विभाग, संस्कृत विभाग आणि प्राचीन विभाग यांच्या सहकार्याने भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व, कला विद्याशाखेअंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात येईल. या कोर्सचा उद्देश विद्यार्थ्यांना आणि जगाला हिंदू धर्माविषयी अनेक अज्ञात पैलू आणि तथ्यांची जाणीव करून देणे आणि त्याची शिकवण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात मदत करणे हा आहे, असे वरिष्ठ रेक्टर प्रो व्ही के शुक्ला यांनी सांगितले. आतापर्यंत, एका परदेशी विद्यार्थ्यासह एकूण ४५ विद्यार्थी पहिल्या बॅचमध्ये सामील झाले आहेत. प्राध्यापक राकेश उपाध्याय यांच्या मते, अशा अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थी आणि तरुण पिढीमध्ये ‘सनातन’ मूल्ये रुजण्यास मदत होईल.



हा कोर्स चार सेमिस्टरचा असून त्यामध्ये १६ पेपर्स आहेत. "1914 मध्ये विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर हिंदू धर्मावरील असा अभ्यासक्रम सुरू होण्यास शतकाहून अधिक काळ लागला," असे भारत अध्यायन केंद्राचे समन्वयक प्रा. सदाशिव कुमार द्विवेदी म्हणाले. या कोर्सचा उद्घाटन समारंभ हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्यात आला असून मंगळवारी या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@