सांगली : कडेगाव नगरपंचायत निवडणूक २०२२मध्ये भाजपने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत कॉंग्रेसला चांगलाच दणका दिला आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील कडेगाव हे कॉंग्रेस युवानेते आणि कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे हे गाव आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ख्याती असलेल्या कडेगावमध्ये पक्षाला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे हा पराभव म्हणजे विश्वजित कदम यांना धक्का मानला जात आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केलेल्या कामांना लोकांनी पसंती दिल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गेल्या १५ वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत कडेगांवात दिवंगत मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी प्रचंड विकासकामे केली. त्यामुळे इथे कॉंग्रेसची सत्ता येईल असे चित्र निवडणुकीआधी कॉंग्रेसने निर्माण केले होते. मात्र, भाजपने ११ जागा जिंकत भाजपकडून जल्लोष करण्यात आला.