लखनौ : मौलाना तौकीर रजा खान हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. यांच्यावर दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे. अशावेळेस कॉंग्रेसने आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी याच मौलानाशी गठबंधन केल्यामुळे कॉंग्रेसवर मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे.
'इत्तेहादुल मिल्लत काउंसिल' या पक्षाचे अध्यक्ष असलेले मौलाना तौकीर रजा खान यांच्याशी कॉंग्रेसने आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मौलाना यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत भाषण करताना "दिवशी मुस्लिम तरुण कायदा हातात घेतील.. त्या दिवशी हिंदूंना हिंदुस्थानात स्थान मिळणार नाही "असे वादग्रस्त विधान केले आहे.
अशा दोन जातींततेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीशी कॉंग्रेस कसे हात मिळवू शकते ? असा प्रश्न आता कॉंग्रेस या पक्षाला देशभरातून विचारला जात आहे.
तर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही हे गठबंधन योग्य नाही असे म्हणत यावर जोरदार टीका केली कॉंग्रेस व इतर पक्ष हिंदुच्या विरोधात राजकारण करत आहे. असाही दावा त्यांनी केला.