अभिमानास्पद! भारताच्या 'जय भीम'ची ऑस्करने घेतली दखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2022
Total Views |

Jay Bhim
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट सुपरस्टार सूर्या अभिनित 'जय भीम' या चित्रपटात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'ऑस्कर'ने या चित्रपटाची दखल घेतली आहे. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने 'सीन अॅट द अॅकॅडमी' विभागांतर्गत तमिळ चित्रपट 'जय भीम'चा व्हिडियो प्रदर्शित केला आहे. ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे.
 
 
 
 
सदर व्हिडियोमध्ये दिग्दर्शक ज्ञानवेल चित्रपटाबद्दल माहिती देत आहेत. १२ मिनिटे ४७ सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यातील आहे. त्यानंतर दिग्दर्शक ज्ञानवेल चित्रपटाच्या विषयाबद्दल सांगत आहेत.
 
 
 
 
 
दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा 'जय भीम' हा चित्रपट २०२१मधील सुपरहिट ठरलेला चित्रपट ठरला. विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त समीक्षकांच्याच नव्हे तर सामान्य प्रेक्षकांच्यादेखील पसंतीस पडला होता. १९९५मध्ये तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या सत्य घटनेवर हा सिनेमा आधारित आहे. रखडलेल्या खून, दरोडा, चोरीची प्रकरणे पूर्ण करण्यासाठी थेट आदिवासींना अटक करायची, न केलेला गुन्हा त्यांनी काबुल करेपर्यंत पोलीस कोठडीत त्यांना मारायचे. या वंचित लोकांसाठी लढणाऱ्या एका वकिलाची कथा चित्रपटात दाखवली आहे.
@@AUTHORINFO_V1@@