'त्याने इगो सोडवा...' ; कपिल देव यांचा विराटला सल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2022
Total Views |

Virat Kohli
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज खेळाडू विराट कोहलीने अचानक कसोटीचे पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर अनेकांनी यावर आपली मते व्यक्त केली. त्याच्या या निर्णयाला बीसीसीआय सोबत झालेल्या वादाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्याच्या या निर्णयचे समर्थन केले. तर काहींनी 'त्याचा हा निर्णय अहंकारातून आला' असल्यचे मत व्यक्त केले. असेच काहीसे मत १९८३मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनीदेखील व्यक्त केले आहे. 'विराटने अहंकार सोडून इतर कर्णधारांच्या हाताखाली खेळावे,' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
 
 
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कपिल देव यांनी म्हंटले आहे की, "गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली हा सतत दबावाखाली दिसत आहे. मात्र, आता त्याने अहंकार सोडून इतर कर्णधाराच्या हाताखाली खेळायला हवे. सुनील गावस्कर हेदेखील माझ्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. मी श्रीकांत आणि अझरूद्दीनच्या मार्गदर्शनाखाली खेळलो आहे. माझ्यात कोणताही अहंकार नाही. विराटला देखील अहंकार सोडावा लागले आणि युवा खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळावे लागले. यामुळे त्याला आणि भारतीय क्रिकेटला फायदा होईल. विराटने नव्या कर्णधाराला मार्गदर्शन करावे."
 
 
पुढे त्यांनी म्हंटले की, "नकीच मी विराटच्या निर्णयाचे स्वागत करतो. कारण, जेव्हापासून त्याने टी - २० संघाचा राजीनामा दिला आहे, तेव्हापासून तो एका वाईट काळातून जात आहे. त्याच्यावर दबावदेखील वाढला आहे. त्याच्या खेळामध्ये अधिक खुलून खेळता यावे, म्हणूनदेखील त्याने हा निर्णय घेतला असावा. विराटने इतका मोठा निर्णय नक्कीच विचार करून घेतला असेल. संपूर्ण भारताने त्याला पाठींबा द्यायला हवा." असेदेखील त्यांनी सांगितले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@