जमात-ए-इस्लामीचे प्रमुख सिराजुल हक म्हणतात इम्रान खान हे आंतरराष्ट्रीय भिकारी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2022
Total Views |

beger.jpg




इस्लामाबाद :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात लाहोरमधील जमावाला संबोधित करताना जमात-ए-इस्लामीचे प्रमुख सिराजुल हक यांनी रविवारी सांगितले की, इम्रान खान यांचे जाणे हेच पाकिस्तानच्या संकटावर एकमेव उत्तर आहे.

सिराजुल हक पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) सोबत पाकिस्तानने केलेल्या व्यवस्थेमुळे इम्रान खान “आंतरराष्ट्रीय भिकारी” बनले आहेत एसा खळबळ जनक दावा केला. हक म्हणाले,इम्रान खानचे जाणे हा सर्व समस्यांवर एकमेव उपाय आहे. सरकारने पेट्रोलियमच्या किंमती पुन्हा वाढवल्या आहेत आणि देशातील महागाईने लोकांचे हाल झाले आहेत.

 
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची दिवाळखोरी
 
विशेषतः पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. देशात महागाई सर्वकालीन उच्चांकावर आहे, ज्यामुळे मूलभूत गरजांच्या किंमती वाढल्या आहेत. फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने पाकिस्तानला बऱ्याच काळापासून ग्रे लिस्टमध्ये ठेवले आहे, जे दहशतवादी वित्तपुरवठ्यात गुंतलेले आहेत अशा संयुक्त राष्ट्रांनी नियुक्त केलेल्या दहशतवादी गटांच्या वरिष्ठ नेत्यांची आणि कमांडर्सची चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी आणखी काही करण्याची विनंती केली आहे.पाकिस्तानची दिवाळखोरी जगजाहीर आहे.



 
 
 

 
 

 
@@AUTHORINFO_V1@@