'त्या' वाघिणीवर हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यसंस्कार!

17 Jan 2022 16:12:55

tigress
 
 
 
भोपाळ : मध्य प्रदेशला व्याघ्र राज्य म्हणून विशिष्ट दर्जा मिळवून देणाऱ्या पेंच राष्ट्रीय उद्यानातील 'सुपर मॉम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीचा शनिवारी मृत्यु झाला. त्यावेळी तिचे वय १६ वर्ष होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून ती आजारी असल्याचे राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करत वाघिणीला निराप देण्यात आला.
 
 
२९ बछड्यांना जन्म देत अनोखा विक्रम!
'कॉलरवाली वाघीण' आणि 'माताराम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीने २९ बछड्यांना जन्म देत अनोखा विक्रम बनवला होता. या वाघिणीचा जन्म सप्टेंबर २००५ मध्ये झाला. 'पेंच की रानी' आणि 'सुपर मॉम' म्हणूनही तिला ओळखले जात होते. मे २००८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत तिने एकूण आठ वेळा २९ बछड्यांना जन्म दिला होता. त्यामुळे पेंचमध्ये वाघांची संख्या वाढवण्यात तिचे हे अविस्मरणीय योगदान असल्याचे सांगितले जाते. २०११ मध्ये या वाघिणीने पाच बछड्यांना एकत्र जन्म दिला होता; जो दुर्मिळ प्रकार म्हणून ओळखला जातो.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0