कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा! : विराटने केलं ट्विट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2022
Total Views |

Virat Kohli
 
 
 
मुंबई : बीसीसीआय विरुध्द विराट कोहली हे प्रकरण ताजं असतानाच विराटकडून शनिवारी मोठा निर्णय घेण्यात आला. टी-२० च्या कर्णधार पदानंतर आता कसोटी सामन्याचे कर्णधारपदही सोडल्याचे त्याने ट्विटरवर सांगितले. टी-२० मालिकांचे कर्णधारपद सोडल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यात वाद सुरू झाले होते.
 
 
 
दक्षिण आफ्रिका येथे नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारताला २-१ च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक विजय संपादन केले आहेत.
 
 
 
 
 
 
'मागील सात वर्षांपासून भारतीय संघाला मी योग्य दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. माझी जबाबदारी मी प्रामाणिकपणे पूर्ण केली आहे. मला इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत संधी दिली, त्याबद्दल मी बीसीसीआयकडे आभार व्यक्त करतो.', असे ट्विट करत त्याने बीसीसीआयचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@