अभिनेता, उद्योजक सचिन जोशीची ४१० कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2022
Total Views |

Sachin Joshi
मुंबई : बॉलीवूडमधील अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीची ४१० कोटींची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी जप्त केली आहे. यामध्ये तब्बल ३३० कोटींचा फ्लॅट, पुण्यातली ८० कोटींची जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली. ही सगळी संपत्ती ओंकार ग्रुप आणि सचिन जोशी यांच्या मालकीची आहे. २०२०मध्ये औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात मनी लाँड्रिंग प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.
 
 
 
 
 
सचिन जोशीने २०१७मध्ये विजय मल्ल्याचा ‘किंगफिशर’ बंगला खरेदी केला होता. सचिनने हिंदीसोबतच काही दाक्षिणात्य चित्रपटात काम केले. याशिवाय अनेक शहरांमध्ये हॉटेल्स आणि क्लब असणाऱ्या प्लेबॉय फ्रॅचाइजीचा तो मालक आहे. ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी सचिन जोशीला ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. मात्र समन्स बजावल्यानंतही सचिन जोशी ईडी कार्यालयात हजर झाला नव्हता. यानंतर त्याला चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणण्यात आले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@