आठ जणांची प्रवासी क्षमता असणाऱ्या वाहनांना ६ एअरबॅग्ज अनिवार्य; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2022
Total Views |
NG

प्रवाशांच्या सुरक्षेस सर्वाधिक प्राधान्य
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आठ जणांची प्रवासी क्षमता असणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज अनिवार्य असतील, असे निर्देश शनिवारी जारी केले आहेत.
 
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे या महत्वाच्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, ८ प्रवासी वाहून नेणाऱ्या मोटार वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी, आता किमान ६ एअरबॅग अनिवार्य करण्यासाठी मसुदा जीएसआर संदर्भातील अधिसूचना मंजूर केली आहे. मंत्रालयाने यापूर्वी १ जुलै २०१९ पासून ड्रायव्हर एअरबॅग आणि १ जानेवारी २०२२ पासून समोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.
 
 
 
 
आता पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना पुढील आणि बाजूकडील टक्करीचा प्रभाव कमी करण्यासाठी, एम १ वाहन श्रेणीमध्ये ४ अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन बाजू/साइड टोर्सो एअरबॅग्ज आणि दोन बाजूचा पडदा/ट्यूब एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. भारतातील मोटार वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही गडकरी यांनी नमूद केले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@