ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2022
Total Views |

vasant




ठाणे : ठाणे शहराचे पहिले नगराध्यक्ष वसंत मराठे यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.१९३४ साली जन्मलेले वसंत नारायण उर्फ योगीदास मराठे हे १९५६ सालापासून ठाण्यात राहत होते. समाजसेवेची आवड असल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांचा सहभाग होता. १९६७ सालच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे ठाणे नगरपालिकेवर त्यांची निवड झाली आणि ते ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष झाले होते.वयाच्या ८८ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आ.संजय केळकर यांनीही त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@