एनडीटीव्हीचे प्रसिद्ध पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

14 Jan 2022 14:47:00

khan.jpg
लखनौ : एनडीटीव्हीचे प्रसिद्ध पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. लखनऊच्या बटलर पॅलेस कॉलनीत आज सकाळी त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमाल खान यांच्या निधनाच्या वृत्ताने पत्रकारिता विश्वात शोककळा पसरली आहे. कमाल खान यांची ओळख एक भडक पत्रकार म्हणून होती.


६१ वर्षीय कमाल खान हे लखनऊच्या बटलर पॅलेस येथील सरकारी बंगल्यात आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा विवाह पत्रकार रुचि कुमारशी झाला होता. असे सांगण्यात येत आहे की पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कमाल खान एनडीटीव्हीच्या उत्तर प्रदेश ब्युरोचे कार्यकारी संपादक होते. कमाल खान गेल्या ३ दशकांपासून पत्रकारितेत होते आणि २२ वर्षांपासून एनडीटीव्हीशी संबंधित होते.


मुख्यमंत्री योगींनी शोक व्यक्त केला

 
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर नेत्यांनीही कमाल खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सीएम योगी म्हणाले की, मी शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. हे पत्रकारितेचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. कमल हे निःपक्षपाती पत्रकारितेचे चौथे स्तंभ आणि भक्कम पहारेकरी होते. समाजवादी पक्षाच्या वतीने ट्विट करून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

 
Powered By Sangraha 9.0