३० वर्षांपासून मूर्तींची तस्करी करणारा काश्मिरी व्यापारी जावेद शाह अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2022
Total Views |

antique
नवी दिल्ली : तामिळनाडू पोलिसांनी आंतरराष्ट्रीय मूर्ती चोरी करणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या जावेद शाह नावाच्या काश्मिरी व्यावसायिकाला अटक केली. त्याच्याकडून सुमारे ४० कोटींच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या. तामिळनाडू पोलिसांच्या सीबी-सीआईडी मूर्ती विंगचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना माहिती मिळाली की महाबलीपुरममधील एका दुकानात काही मूर्ती बेकायदेशीरपणे ठेवल्या जात आहेत. या आधारे पोलिसांचे विशेष पथक तयार करून त्यांनी जावेद शाहच्या इंडियन हॅन्डीक्राफ्ट एम्पोरियम येथील दुकानावर छापा टाकला. माहिती खरी ठरल्यानंतर पोलिसांनी जावेद शहाला अटक केली.
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद शहाच्या दुकानातून ८ प्राचीन वस्तूंसह ११ मूर्ती जप्त केल्या गेल्या. मूर्ती विकण्याचा परवाना नसताना जावेद हे काम करत होता, हे तपासानंतर सिद्ध झाले. पुरातत्व विभागाने या मूर्ती अकराव्या शतकातील असल्याचे सांगितले. जप्त केलेल्या मूर्तींमध्ये देवी पार्वती, बासरी वाजवणाऱ्या कृष्णाची मूर्ती, दहा मुखी रावणाची मूर्ती आणि इतर पुरातन वस्तूंचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत सुमारे ४० कोटी आहे. जावेद शाह हा या रॅकेटचा सूत्रधार असून त्याचे संबंध आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या गुन्हेगारांशी असू शकतात, असे पोलिसांनी सांगितले.
 
 
जावेद शहा हा मूळचा काश्मीरचा असून तो महाबलीपुरममध्ये मूर्तीचे दुकान चालवतो. चौकशीत जावेदने पोलिसांना सांगितले की, तो गेल्या ३० वर्षांपासून तस्करी करत आहे. शहरातील हॉटेल्समध्ये येणाऱ्या पर्यटकांना मौल्यवान मूर्ती छुप्या पद्धतीने विकत असल्याचे त्याने कबुल केले. अटकेनंतर त्याला रिमांडवर पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी त्याचा भाऊ फरार असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@