नवी दिल्ली - २६ जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होणार असून त्याआधी पुन्हा एकदा भारतविरोधी शक्तींनी कटकारस्थान सुरू केले आहे. २६ जानेवारीला जानेवारीला प्रजासत्ताक दिनी तिरंग्याऐवजी खलिस्तानी ध्वज फडकवला जाईल, अशी नवी धमकी प्रो-खलिस्तान समर्थक गट शिख फॉर जस्टिस (SFJ) ने दिली आहे. 'एसएफजी'ने प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांनी ही घोषणा केली आहे. 'एसएफजी'चे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रतिबंधित संघटनेने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत भारतीय तिरंग्याऐवजी खलिस्तानी ध्वज फडकावणाऱ्या व्यक्तीला १ दशलक्ष डॉलर 'बक्षीस' जाहीर केले आहे.
व्हिडीओमध्ये पन्नू म्हणाले आहेत की, "ही शीख आणि हिंदची बाब आहे. यावेळी दिल्लीत कुठेही तिरंगा फडकवू दिला जाणार नाही. खलिस्तानी सार्वमताव्दारे पंजाबला भारतीय कब्जातून मुक्त करण्याची मोहीम २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहणार आहे. व्हिडिओमध्ये तो भारतीय झेंडा जाळतानाही दिसत होता. यासंदर्भात खलिस्तानी गट सोशल मीडियावर शिख फॉर जस्टिस व्हिडिओ कॅम्पेनसह मोहीम चालवत आहे. त्यामुळे शिख फॉर जस्टिसने एक पोस्टरही जारी केले असून त्यात पीएम मोदींचा फोटोही आहे. त्यावर लिहिले आहे की, २६ जानेवारीला पीएम मोदींचा तिरंगा रोखून खलिस्तानी ध्वज फडकवला जाईल.पन्नूच्या ताज्या धमकीनंतर सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आहेत. तसेच २६ जानेवारीमुळे राजधानी दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
गेल्या वर्षी भारतात शीखांना भडकवण्याचा असाच प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी 'एसएफजी'ने प्रजासत्ताक दिनी इंडिया गेटवर खलिस्तानचा ध्वज फडकवणाऱ्यासाठी २.५ लाख रोख बक्षीस जाहीर केले होते. अलीकडेच पंजाबमधील भटिंडा उड्डाणपुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला रोखण्याची जबाबदारी 'सिख्स फॉर जस्टिस'ने घेतली होती. यासोबतच या संघटनेने सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना फोन करून धमकावले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात लढू नका, अशी धमकी संघटनेने वकिलांना दिली होती. ५ जानेवारी, २०२२ रोजी हुसैनवाला उड्डाणपुलावर त्यांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला २० मिनिटे थांबवल्याचा दावा त्यांनी केला.