... आणि मी हैराण झाले ; सिद्धार्थच्या माफिनाम्यावर सायनाची प्रतिक्रिया

महिलांना अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही : सायना नेहवाल

    दिनांक  12-Jan-2022 17:56:13
|

Saina Nehwal
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर केलेल्या अश्लाघ्य ट्विट केल्यानंतर संपूर्ण देशभरातून त्याच्यावर टीका करण्यात आली. यानंतर त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितले. मात्र, त्याने केलेल्या या टिप्पणीमुळे त्याच्यावर गुन्हादेखील दाखल झाला. यानंतर अखेर बॅडमिंटनपटू सायना नेहवालने प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
सायनाने म्हंटले की, "त्याने (सिद्धार्थ) आधी माझ्याबद्दल काही बोलले आणि नंतर माफी मागितली. हे प्रकरण इतके व्हायरल का झाले हे मलाही कळत नाही? मला स्वतःला ट्विटरवर ट्रेंड करताना पाहून धक्काच बसला. सिद्धार्थने माफी मागितली याचा आनंद आहे." पुढे सायनाने म्हंटले की, "तुम्ही महिलांना अशा प्रकारे टार्गेट करू शकत नाही. मला यामुळे त्रास झालेला नाही. मी माझ्या जागी आनंदी आहे. देव त्याचे भले करतो." ट्विटरवरून टीका झाल्यानंतर अभिनेता सिद्धार्थने सायनबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागितली. त्यामुळे या प्रकरणावर पडदा जरी पडला असला, तरीही सिद्धार्थच्या प्रतिमेला यावेळी चांगलाच धक्का बसला आहे. त्याने याआधी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अक्षेपार्ह्य विधाने केली आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.