चायनीज 'विवो' ला 'टाटा' ; टाटा कंपनी आयपीएलची टायटल स्पॉर्न्सर

आयपीएलची टायटल स्पॉर्न्सर राहणारी तिसरी भारतीय कंपनी

    दिनांक  11-Jan-2022 16:21:42
|

TATA
मुंबई : भारतातील सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या टाटा कंपनीने आता आयपीएलमध्ये धमाकेदार प्रवेश केला आहे. चायनीज कंपनी 'विवो'ला मागे टाकत टायटल स्पॉर्न्सर म्हणून बीसीसीआयने 'टाटा कंपनी'ला संधी देण्याच्या तयारीत आहे. शक्यतो यावर्षीपासून म्हणजेच आयपीएल २०२२ पासून 'टाटा कंपनी' आयपीएलची टायटल स्पॉर्न्सर असणार आहे. एका चायनीज कंपनीला मागे टाकत टाटा कंपनीला संधी दिल्यामुळे सोशल मिडियावर आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
 
एकीकडे देशात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असताना आयपीएल २०२२चे आयोजन पुढे धाकाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर नव्याने आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या २ संघांना ड्राफ्ट बनवण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मेगा लिलावाची तारीख हा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो. पण आता आयपीएलबरोबर टाटा या कंपनीचे नाव जोडले गेले असल्यामुळे भारतीयांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. अद्याप अधिकृतरीत्या बीसीसीआयकडून याची घोषणा झालेली नाही.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.