राज्यपालांच्या हस्ते ‘कर्मयोद्धा राम नाईक’ पुस्तकाचे प्रकाशन!

11 Jan 2022 14:53:36

karmayoddha-ram-naik
 
 
 
मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्यावर आधारित विविध मान्यवरांच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘कर्मयोद्धा राम नाईक’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला राम नाईक, खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार मंगल प्रभात लोढा, नवभारत टाइम्सचे माजी संपादक शचिंद्र त्रिपाठी, इंकिंग इनोव्हेशन प्रकाशन संस्थेचे आनंद लिमये आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
सदर पुस्तकात दिवंगत उर्दू पत्रकार व संपादक वकार रिजवी यांनी राम नाईक यांच्यावर विविध उर्दू लेखकांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन केले आहे. त्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी यांच्या निवडक भाषणांचाही उल्लेख आहे. तसेच राम नाईक यांच्या 'चरैवेती, चरैवेती' पुस्तकास दिलेल्या विविध मान्यवरांच्या प्रस्तावनेचा सुध्दा यात समावेश करण्यात आला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0