लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण : ब्रीच कँण्डी रुग्णालयात दाखल

    दिनांक  11-Jan-2022 13:12:20
|

lata 1

मुंबई : देशभरात कोरोनाचा वाढता आलेख हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. मंगळवारी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांना कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानं रुग्णालयात दाखल केले आहे. त्या मुंबईतील ब्रीच कँण्डी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांचे वय हे ९२ वर्ष आहे. कोरोनाच्या सौम्य लक्षणांमुळे त्यांना खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांत बॉलीवुडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. त्यात लता मंगेशकर यांच्यानंतर ऋतिक रोशनची पूर्वपत्नी सुझॅन खान हिलाही बाधा झाली होती. दरम्यान, ९२ वर्षांच्या लता मंगेशकर यांची प्रकृती काही महिन्यांपूर्वी बिघडली होती. २०१९मध्ये त्यांना श्वासोच्छश्वासाचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.