मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2022
Total Views |

rekha kam at




मुंबई : मराठी कलाक्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री रेखा कामत (Rekha Kamat) यांचं निधन मुंबईत निधन झालं. त्या ८९ वर्षाच्या होत्या. वृध्दापकाळामुळे रेखा कामत यांची प्राणज्योत मालवली. त्या माहिम येथील त्यांच्या निवासस्थानी राहत होत्या. गेली ६० वर्षेहून अधिक काळ त्यांनी कलाक्षेत्रात आपलं योगदान दिलं. रंगमंच, दूरचित्रवाणी, चित्रपट आदी विविध माध्यमातून रेखा कामत यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.



प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याच्या त्यांच्या अट्टाहासामुळे सर्वच भूमिका प्रेक्षकांना भावल्या. कामत यांचं माहेरचं नाव नाव कुमुद सुखटणकर होतं. दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीत त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. शैक्षणिक शिक्षण घेत असतांनाच त्यांनी कथ्थक आणि भरतनाट्यमचाही त्यांनी अभ्यास केला. भानुदास मानकामे व घोडके गुरुजींकडून गायनाचे धडे घेतल्याचं सांगण्यात येतं.


त्यांची ऋणानुबंध, संगीत एकच प्याला, गंध निशिगंधाचा, गोष्ट जन्मांतरीची, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझे आहे तुजपाशी, दिल्या घरी तू सुखी राहा, प्रेमाच्या गावा जावे, मला काही सांगायचं आहे, लग्नाची बेडी, सुंदर मी होणार, संगीत सौभद्र आदी नाटकं गाजली. अगं बाई अरेच्चा!, कुबेराचं धन, गृहदेवता, लाखाची गोष्ट आदी चित्रपट त्यांचे विशेष गाजले. तसंच एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, याला जीवन ऐसे नाव, सांजसावल्या या मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या.






@@AUTHORINFO_V1@@