अलिगढ : अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य सुरू झाल्याने अनेक भाविकांकडून श्रध्देपोटी निरनिराळ्या गोष्टी मंदिरासाठी अर्पण केल्या जात आहेत. ज्वालापुरी येथे राहणाऱ्या सत्यप्रकाश शर्मा या ६५ वर्षाच्या व्यक्तीकडून एक भव्य कुलूप बनवण्यात आले आहे. १० फूट लांब आणि ६ फूट रूंद असलेल्या या कुलूपाचे वजन ४०० किलो असून याची चावी तब्बल ३० किलोची आहे. हे कुलूप श्रीरामाच्या छायाचित्रांनी सुशोभित करण्यात आले असून सहा महिन्यांच्या कालावधी नंतर ते पूर्णत्वास आले आहे.
'शतकानुशतके आम्ही कुलूप बनवण्याचे काम करत आलो आहोत. श्रीरामाच्या मंदिरासाठी एक भव्य कुलूप बनवण्याची माझी ईच्छा होती. हे कुलूप बनवल्यास अलिगढची सुध्दा वेगळी ओळख तयार होईल.', असे सत्यप्रकाश शर्मा यांनी सांगितले.