एसटी संप : विलिनीकरणाची लढाई कोर्टावर सोपवा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2022
Total Views |

MSRTC

मुंबई : महिनाभरापासून अधिक काळ सुरू असलेल्या एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मैदानात उतरावे लागले. पवारांनी सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांच्या २२ पेक्षा अधिक संघटना नेत्यांसह मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते.

एसटी कृती समिती संघटनांनी बैठकीतील प्रस्तावांबद्दल समाधान व्यक्त केले आहे. एसटी कृती समितीतर्फे दिलेल्या माहितीनुसार, 'शरद पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यातील बैठकीत काही मुद्दे मांडण्यात आले आहेत. कृती समितीने आपल्या मागण्या पुढे ठेवल्या. दोन महिने सुरू असलेल्या या संपाबद्दल सविस्तर चर्चा झाली. सातवा वेतन आयोगासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन दोन्ही नेत्यांनी दिली आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होत आहे. तसेच निलंबित व बडतर्फ झालेल्यांना एसटी सुरू झाल्यावर निर्णय घेतला जाईल.'

विलिनीकरणाची लढाई कोर्टात!
"एसटी संपकऱ्यांनी विलिनीकरणाची लढाई कोर्टावर सोपवावी आणि कामावर यावे, असे आवाहन कृती समितीतर्फे करण्यात आले आहे. शिवसेना प्रणित एसटी कामगार सेनेच्या कार्यध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सर्व कामगार सेनेच्या सभासदांना आवाहन करतो की, एसटी जगली तर आपण जगणार आहे. आपण सर्वांनी महामंडळाच्या कामावर रुजू व्हावं, एसटी सुरु करावी, आपल्यावर कारवाई होणार नाही याची ग्वाही मिळाली आहे.'









@@AUTHORINFO_V1@@