बांग्लादेशच्या निवडणूक प्रचारात हिंदूंना मिळत्यात धमक्या; जगणे झाले कठीण

    दिनांक  10-Jan-2022 16:46:23
|
bangladesh


ढाका -
बांगलादेशाने ‘लोकशाही’ निवडणुका घेण्याचा दावा केला असला तरी, या काळात अल्पसंख्याकांसाठी जगणे सोपे नसल्याचे दिसत नाही. अवामी लीग स्वतःला अल्पसंख्याक-अनुकूल आणि 'धर्मनिरपेक्ष' राजकीय पक्ष म्हणून दाखवत आहे. मात्र, त्यांचे सदस्य अनेकदा देशातील धार्मिक अल्पसंख्याकांचा छळ करताना दिसतात. बांगलादेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच अशा दोन घटना समोर आल्या आहेत.
 
 
 
झेनाईदह जिल्ह्यातील भाटबरिया गावातील हिंदूंना अवामी लीग युनियनचे अध्यक्ष (बोट चिन्ह असलेले) आणि त्यांच्या समर्थकांकडून शस्त्र दाखवून धमकवण्यात आले. स्थानिकांनी सांगितले की, दिवंगत शिक्षक रणजीत कुमार घोष यांचा मुलगा सुब्रत घोष अनेक दिवसांपासून अननस चिन्हासाठी (विरोधी पक्ष) प्रचार करत होता. तेव्हापासून त्यांना सातत्याने धमक्या येत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती. परिसरातील रहिवासी दहशतीत आणि भितीखाली जगत आहेत. शुक्रवार, ३२ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास काही पत्रकारांनी या भागाला भेट दिली आणि पाहिले की हिंदू समाजाची बहुतेक घरे पुरुष नसलेली होती. वाटेत त्यांना अजितकुमार घोष हे सेवानिवृत्त शिक्षक भेटले. घोष यांनी त्यांना सांगितले की, “त्यांनी आम्हाला कधीही घरात राहू दिले नाही. रात्रीच्या वेळी ते आम्हाला शस्त्राने धमकावत आहेत. जर या निवडणूकीत बोट चिन्हाच्या उमेदवारांना मत दिले नाही तर तुम्हाला त्रास होईल, असे ते म्हणतात. बोट चिन्हावर उभे राहिलेले उमेदवार जिंकून नाही आले, तर मी देशात राहू शकणार नाही. या म्हातारपणात मी कुठे जाणार?", असे घोष म्हणाले.

दुसऱ्या एका प्रसंगात कॉक्स बाजार जिल्ह्यातील फंसियाखली युनियन परिषद निवडणुकीसाठी अवामी लीगच्या तिकिटावर लढत असलेले उमेदवार हेलाल उद्दीन हेलाली यांनी वेगळाच आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या निवडणूक क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजातील मतदारांना अवामी लीगमधीलच काही नेत्यांनी त्यांना मतदान न करण्यासाठी धमकावले आहे. हेलालचा दावा आहे की गियास उद्दीन आणि त्याचे सहकारी घरोघरी जाऊन त्याचा धाकटा भाऊ नसीर यांचा प्रचार करत आहेत. मोटारसायकल या निवडणूक चिन्हासह उद्दीन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. फंसियाखळी युनियनच्या विविध वार्डात राहणार्‍या हिंदू आणि बौद्धांना गियास उद्दीन आणि त्याच्या समर्थकांकडून धमकावले जात आहे. त्यांच्यावर यापूर्वी धार्मिक अल्पसंख्याकांना त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.