अहमदाबादचा कर्णधार हार्दिक पांड्या ;तर कोच म्हणून आशिष नेहरा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2022
Total Views |

sports
मुंबई : गेले काही महिने भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हा अनेक बाबतीत चर्चेत राहिला. फिट नसतानाही त्याचा टी - २० संघातील समावेश, तर दुखापत असतानाही संघात संधी मिळून खराब कामगिरी. यामुळे हार्दिक पांड्याचे क्रिकेटमधील भविष्य धोक्यात आले आहे का? असा प्रश्न विचारण्यात येत होता. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर आयपीएल २०२२मध्ये नव्याने येत असलेल्या अहमदाबाद संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत.
 
 
मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याव्ही ओळख होती. मात्र, २०२२च्या मेगा लिलावआधी मुंबईने त्याला रिटेन करण्यास नकार दिला. तसेच, २०१९ पासून तो फिटनेसच्या समस्यांशी झुंजत होता. त्याने पाठीची सर्जरीदेखील केली होती. मात्र, तो गोलंदाजीमध्ये तर अपयशी ठरत होताच, शिवाय फलंदाजीमध्येही त्याने सुमार कामगिरी केली. यामुळे त्याला भारतीय संघातूनही स्थान गमवावे लागले. असे असले तरीही आता त्याला अहमदाबादचा करण्दाह्र म्हणून दुसरी संधी मिळत आहे.
 
 
हार्दिक पांड्या हा मुळचा गुजरातचा असल्याने त्याचा या संघात समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात त्याला कर्णधार पदाची धुरा सांभाळायची संधी मिळण्याच्या दात शक्यता आहेत. आधी यासाठी श्रेयस अय्यरचे नाव चर्चेत होते. तसेच, भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहरा याला या संघाचा प्रशिक्षक म्हणून संधी देण्यात येणार आहे. या संघात अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानचादेखील समावेश असू शकतो. याबाबतीत अधिकृतरित्या लवकरच जाहीर केले जाईल, असे सांगण्यात आले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@