फक्त २० मिनिटांत तयार होणारं 'टेम्पो-स्टेज'

10 Jan 2022 17:06:27

Tempo Stage




कल्याण :
लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या कल्याणच्या एका उच्चशिक्षित गृहिणीने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनोखी संकल्पना राबवली आहे. चालता-फिरता स्टेज उभा करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम अश्विनी संतोष जाधव करत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे काहींना कार्यक्रमासाठी मंडपाचा खर्च परवडत नाही. अशांना हा स्टेज स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे. अनेक घरगुती किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी त्यांच्या या अनोख्या स्टेजला बरीच मागणी मिळत आहे.
 
 
कोरोना काळात लॉकडाऊन घोषित झाल्याने जाधव कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले होते. केवळ पतीच्या पगारावर घरखर्च भागविणे कठीण जात होते. यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, अशी कल्पना त्यांना सुचली. बँकेतून कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांनी एक मिनीटेम्पो खरेदी केला. त्यावर छानशी सजावट करून एक स्टेज उभा केला. सध्या लहान-सहान कार्यक्रमासाठी स्टेज म्हणून या टेम्पोचा वापर केला जात आहे. अवघ्या २० ते ३० मिनिटांत याची सजावट पूर्ण केली जाते.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0