तालीबान्यांच्या पत्रकार परिषदेचे कौतूक करणाऱ्यांनी हा प्रकार पाहिला का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2021
Total Views |

TALIBAN 2_1  H



अफगाणिस्तानात दोन पत्रकारांना बेदम मारहाण 




काबुल : काबुलमध्ये महिलांच्या आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या दोन अफगाणिस्तान पत्रकारांना मंगळवारी तालिबानच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले आणि जबर मारहाण केली, असे ह्यूमन राइट्स वॉचने म्हटले आहे.काबुलस्थित 'इटिलात-ए-रोझ' या मीडिया आउटलेटच्या 'ताकी दर्याबी' आणि 'नेमत नकदी' यांना मंगळवारी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तालिबानने महिला आणि मुलींच्या हक्कांचे उल्लंघन थांबवण्याची मागणी करत काबुलमधील महिलांनी केलेल्या निदर्शनांना पत्रकारांनी कव्हर केले होते.

 
एटिलाट-ए-रोझने नोंदवले की तालिबानच्या अधिकाऱ्यांनी कथितरित्या या दोघांना काबूलच्या एका पोलीस ठाण्यात नेले, त्यांना वेगळ्या जेलमध्ये ठेवले आणि त्यांना केबल्सने जबर मारहाण केली. दोन्ही पुरुषांना ८ सप्टेंबर रोजी सोडण्यात आले आणि त्यांच्या पाठीवर आणि चेहऱ्यावर जखमा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले.


एटिलाट-ए-रोझचे मुख्य संपादक झाकी दर्याबी म्हणाले: "तालिबानने ताब्यात घेतलेल्या माझ्या दोन सहकाऱ्यांना चार तास मारहाण केली." ते पुढे म्हणाले: "तालिबानच्या सतत आणि क्रूर छळाखाली, पत्रकारांनी चार वेळा चेतना गमावली."ह्युमन राइट्स वॉचने असेही नोंदवले की तालिबानच्या अधिकाऱ्यांनी ७ सप्टेंबर रोजी टोलोन्यूज फोटो जर्नलिस्ट वाहिद अहमदी यांना ताब्यात घेतले आणि त्याच दिवशी त्यांची सुटका केली. त्यांनी त्याचा कॅमेरा जप्त केला आणि इतर पत्रकारांना निषेधाचे चित्रीकरण करण्यापासून रोखले होते.


 
नव्या इस्लामी राजवटीत त्यांच्या स्वातंत्र्याची हमी मिळावी या मागणीसाठी महिलांनी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी अफगाणिस्तानच्या राजधानीतून मोर्चा काढला. तालिबानने इस्लामिक कायद्यानुसार महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे,परंतु असे काही होताना दिसत नसल्यामुळे तेथील स्त्रीयांनी याविरोधात मोर्चा काढला होता. तालिबानने मंगळवारी अंतरिम मंत्रिमंडळाची घोषणा केली ज्यामध्ये त्यांच्या कट्टर राजवटीतील दिग्गजांचा समावेश आहे, ज्यात महिला किंवा माजी राजकीय व्यक्ती नाहीत.









 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@