पाकिस्तानविरोधात अफगाणिस्तानमध्ये नारे,तालिबानचा बेछूट गोळीबार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2021
Total Views |

taliban_1  H x
 
काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हाती सत्ता आल्यानंतर ,आपले स्वतंत्र्य गमावलेल्या अनेक नागरिक तालिबानविरोधात बंड पुकारत आहेत.काही दिवसांपूर्वी झेंड्याच्या बदलीमुळे तेथील लोकांनी आंदोलन केले होते,त्यास बंदुकीने उत्तर देवून तालिबान त्यांना शांत करण्यास यशस्वी झाला. परंतु आता काबुल आणि तेहरान मध्ये आता पुन्हा एकदा हजारोंचा लोकसमुदाय पाकिस्तानविरोधात रस्त्यावर आपल्याला दिसून आला आहे.


 
गेले काही दिवस पंज्शीर हे तालिबानविरोधात लढा देत होते,परंतु काळ पंजशीर पडले आणि संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानचा ताब्यात गेला. यासाठी पाकिस्तानने तालिबानला मदत केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आमच्या देशाच्या अंतर्गत गोष्टीत इतर देश नाक का घुसवत आहेत ? या प्रश्नांसाठी लोकसमुदाय रस्त्यावर उतरलेला आहे.


या मोर्चात पाकिस्तानविरोधी नारे लोक देत आहेत, या आंदोलनास सुरुवात झाली , जेव्हा तालिबानच्या प्रमुख नेत्याच्या ऑफीसमध्ये पाकिस्तानचे आयसआई चे प्रमुख बसलेले दिसले, पाकिस्तान आणि इतर देशांचे अफगाणिस्तानातील वाढत्या कारवाया तेथील अनेक नागरिकांना रुचताना दिसत नाही आहेत.त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर याविरोधात आंदोलन केले जात आहे.या आंदोलनावर तालिबान बेछूट गोळीबार करत आहेत. तरीसुद्धा महिला,बालक आणि पुरुष विविध भागातून या विरोधात पुढे येताना दिसत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 

 
@@AUTHORINFO_V1@@