नीरव मोदीच्या मेहूण्याला मुंबई उच्च न्यायालयचा दिलासा

07 Sep 2021 17:50:32
nirav_1  H x W:
 
मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असणारे मैनक मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पीएनबीला १३,८०० रुपयांना गंडा घातल्यानंतर मैनक मेहता हे परदेशात फरार झाले होते. मैनक मेहता हे नीरव मोदी यांचे मेहुणे आहेत .२०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मैहता दाम्पत्यांना अटक वॅारंट काढले होते.
 
 
मैनक मेहता मंगळवारी कोर्टात हजर झाले होते. त्यांच्या वकिलांनी कार्टाला सांगितले की, मेहता हे ईडीच्या आदेशानुसार तपासयंत्रणेला सहकार्य करायला तयार आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर ते वेळेवर कोर्टात हजर राहतील. कोर्टाच्या परवानगीशिवाय ते परदेशात जाणार नाहीत. कोर्टाने त्यांना ५० हजार कॅश बाॅण्ड जामीन मंजूर करून अटक वाॅरंट रद्द केले आहेत. त्यामुळे मेहता यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
 
 
मैनक मेहता कोण आहेत?
 
मैनक मेहता हे नीरव मोदी यांचे मेहुणे आहेत, परदेशात ते मोठ्या उच्च पदावर काम करत होते, पीएनबी घोटाळा योजनेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. पीएनबी मनी लाॅण्ड्रिंग आरोपाखाली ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0