विषाणू संसर्ग व त्यावर खात्रीचा होमियोपॅथिक उपाय

06 Sep 2021 21:24:00
  covid_1  H x W: 
 
 
 
गेल्या दीड ते पावणे दोन वर्षांपासून चाललेल्या ‘कोविड-१९’ला रोखण्यात सध्याच्या उपचारांना अपयश आलेले स्पष्टपणे दिसून येते. ‘कोविड’चा विषाणू संसर्ग आटोक्यात येण्यापेक्षा आणखीनच नवनवीन अवतार घेऊन पुढे येताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विचार केला असता, होमियोपॅथीमध्ये मात्र, यावर खात्रीचा इलाज आहे. कारण, होमियोपॅथीची औषधे ही पूर्णपणे नैसर्गिक, शक्तिशाली व सुरक्षित आहेत.
 
 
 
या व अशा प्रकारच्या साथीच्या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी काही ठोस उपाययोजनाही होमियोपॅथीमध्ये आहे. ‘ऑर्गेनॉन ऑफ मेडिसीन’ या ग्रंथात त्याबद्दल नमूद करून ठेवलेले आहे.साथीचा आजार हा कमी वेळात खूप मोठ्या समुदायाला संसर्ग करू शकतो. या प्रकारच्या रोगात सर्वसाधारण लक्षणे ही सारखीच दिसत असतात आणि या सर्व लक्षणांचे मूळ हे साधारणपणे एकच असते. या व अशा प्रकारच्या साथीच्या आजारात जर वेळीच उपचार केला नाही, तर रुग्णाचा मृत्यूदेखील ओढवू शकतो. काही आजार हे साथीच्या रोगांच्या रूपात येतात व माणसाला आयुष्यात एकदातरी होऊन जातात.
 
 
 
जसे चिकन पॉक्स, गोवर, डांग्या खोकला, गालगुंड इ. आजार एकदा होऊन गेले की, परत सहसा होत नाहीत. कारण, शरीरात त्याच्या विरुद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती तयार होत असते. डॉ. हॅनेमान यांनी या साथीच्या रोगांना पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी काही संशोधनात्मक कार्य ‘ऑर्गेनॉन ऑफ मेडिसीन’मध्ये लिहून ठेवले आहे. परिच्छेद क्र. १००, १०१ व १०२ मध्ये डॉ. हॅनेमान यांनी याबद्दल लिहून ठेवले आहे. यात ते होमियोपॅथीत ‘स्पेसिफीक रेमेडी’ याबद्दल लिहितात. साथीच्या रोगाच्या लोकांमध्ये आढळणार्‍या प्रमुख लक्षणांवरून या ठिकाणी औषधे शोधली जातात व यातील एक औषध हे ‘बेस्ट सिलेक्शन’ असते. यालाच ‘जीन्स एपिडेमिक्स’ असे म्हणतात.
 
 
 
‘जीन्स एपिडेमिक्स’चा हा संदर्भ व सिद्धान्त साथीच्या आजाराला थोपवणार्‍या औषधाबाबतही लागू होतो, त्याला 'Homoeoprophylaxis' असे म्हटले जाते.या ‘जीन्स एपिडेमिक्स’मध्ये मुख्यत्वे करून तीन प्रकारच्या दृष्टिकोनाने अभ्यास केला जातो.या दृष्टिकोनामुळे रोग नुसता आटोक्यातच येतो असे नाही, तर रोग पूर्णपणे नष्टही होतो. रोगाला नष्ट करण्याची ही पूर्णपणे
 नैसर्गिक उपाययोजना असते. यात मुख्यत्वे करून
  
 
१) ‘कॉन्स्टिट्यूशन अ‍ॅप्रूव्हर’ म्हणजेच वैयक्तिकीकरणावर भर देऊन त्यानुसार प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वानुसार औषध शोधणे.
 
२) ‘जीन्स एपिडेमिक्स’ची औषधे- या प्रकारात आजाराची सर्वसाधारण व खास अशी लक्षणे दिसलेल्या काही रुग्णांचा अभ्यास करून मग त्यावरून त्या आजाराशी निगडित अशी काही औषधे शोधण्यात येतात. त्याला ‘जीन्स एपिडेमिक्स’ औषधे असे म्हणतात. वैयक्तिकीकरणाचा सिद्धान्त इथे सुरुवातीला वापरात येत नाही.
 
३) तिसरा प्रकार म्हणजे ‘नोसोड’ प्रकारची औषधे - ही औषधे वापरून मग त्यानुसार एखादा विशिष्ट असा आजार आटोक्यात आणणे. जशी गरज पडेल तसतसे यात विचार घ्यावा लागतो. पुढील भागात आपण या दृष्टिकोनात या सिद्धान्ताचा अभ्यास करूया.
 
-डॅा. मंदार पाटकर 
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६
 
Powered By Sangraha 9.0