मंत्र्यांना कोरोना नियमांचे वावडे? मंत्री आव्हाड यांच्याकडून पुन्हा उल्लंघन

06 Sep 2021 11:01:31

Jitendra Awhad_1 &nb
ठाणे : एकीकडे महाराष्ट्र सरकार वेळोवेळी तिसऱ्या लाटेची आठवण वेळोवेळी सामान्य नागरिकांसाठी करत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे मंत्री कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे आता मंत्र्यांना कोरोना नियमांचे वावडे आहे का? असा प्रश्न सामन्यांकडून विचारला जात आहे. महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या ३ दिवसात दोनदा कोरोन नियमांचे उल्लंघन केले आहे. आधी ३ सप्टेंबरला भिवडी येथे त्यांच्याकडून सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडला होता. तर आता डोंबिवलीमध्येदेखील असाच प्रकार घडला आहे.
 
 
डोंबिवली पूर्वमधील राम नगर परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्यासाठी तसेच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळाव्यासाठी रविवारी ५ सप्टेंबरला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड डोंबिवलीत आले होते. विशेष म्हणजे, कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून अनेक सल्ले दिले. असाच एक सल्ला कोरोनाबाबत दिला. तिसरी लाट हलक्यात घेऊ नका, असे आव्हाडांनी सांगितले.
 
 
प्रत्यक्षात मात्र याठिकाणी वेगळेच चित्र होते. याच मेळाव्यात कोरोनाबाबत कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. सोशल डिस्टसिंग सोडाच पण बऱ्याच कार्यकर्त्याना मास्कचा देखील विसर पडल्याचे चित्र होते. सर्व सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उघडणाऱ्या पालिका प्रशासन व पोलीस या मेळाव्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0