बेळगावमध्ये भाजपला बहुमत ; शिवसेनेला भोपळा

06 Sep 2021 17:21:07

Bel_1  H x W: 0
बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या बेळगाव महानगर पालिका निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत शिवसेनेला मात्र सपशेल हार स्वीकारावी लागली. तर कॉंग्रेसने ९ जागांवर विजय प्राप्त केला. अपक्ष १२ आणि एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते.
 
 
प्राथमिक माहितीनुसार, या निवडणुकीत ५५ टक्के मतदान झाले होते. यामध्ये आता भाजपला ३३ जागांचे बहुमत मिळाले असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ४ जागा निवडून आल्या आहेत. तर कॉंग्रेसच्या नावावर १०, अपक्ष ८ आणि एमआयएमच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. सत्तेसाठी ३३ जागांची गरज असते आणि भाजपने हा आकडा पार केला असून आता बेळगाव नगरपालिकेवर विजय मिळवला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0