आधी म्हणायचे टीव्ही पाहू नका! आता म्हणतात केबलवाल्याला फोन करा!

    दिनांक  05-Sep-2021 15:02:30
|

1 _1  H x W: 0

मुंबई : एनडीटीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांची मोठी अडचण झाली आहे. हॅथवे केबलने त्यांच्या प्राईम पॅकमधून एनडीटीव्ही वाहिनी वगळली आहे. त्यामुळे रवीश कुमार यांनी त्यांच्या प्रेक्षकांना याबद्दल एक मोहिम उभी करण्यास सांगितली आहे. "ज्यांना ज्यांना हॅथवे केबलच्या पॅकमध्ये एनडीटीव्ही दिसत नसेल त्यांनी ताबडतोब केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि एनडीटीव्ही वाहिनीची मागणी करा," असे आवाहन त्यांनी केले आहे.


भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे माध्यम प्रभारी आणि प्रवक्ते अजय शेरावत यांनी एका व्हीडिओद्वारे रवीश कुमार यांची फिरकी घेतली आहे. पूर्वी तर हे म्हणायचे की, टीव्ही पाहू नका. टीव्हीमध्ये काही लोकांचे हितसंबंध तुमच्याशी नव्हे तर नेत्यांशी आहेत. टीव्हीद्वारे काही लोक तुमच्या मुलांना 'मानवी बॉम्ब' म्हणून तयार करत आहेत. तसेच टीव्हीवर हिंदू मुस्लीम वाद दाखवून तुमची माथी भडकविण्याचा प्रकार काही चॅनल्स करत आहेत, असेही रवीश कुमार म्हणाले होते. आता तेच रवीश कुमार आपला चॅनल लोकांनी पहावा यासाठी आग्रह धरताना का दिसतायत, असा प्रश्न अजय शेरावत यांनी विचारला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.