टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक २०२०मध्ये भारताची चमकदार कामगिरी सुरु ठेवली आहे. शनिवारी भारतीय नेमबाज मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी मिश्र ५० मीटर पिस्टल या प्रकारात पदक पटकावत इतिहास रचला आहे. मनीष नरवालने या प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, तर सिंहराज अधाना यांनी रौप्य पदक पटकावले आहे. भारताच्या नावावर आता १५ पदके जमा असून यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदक पटकावले आहेत.
मनिष नरवालने मिश्र ५० मीटर पिस्तूल प्रकारात २१८.२ अंक कमावले तर सिंहराज यांनी २१६.७ अंक पटकावले. याचसोबत मनीषने या प्रकारात एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच, १९ वर्षीय मनीषने भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. तर, सिह्राज यांनी या स्पर्धेतले दुसरे पदक पटकावले आहे. विशेष म्हणजे, हे दोघेही फरीदाबादचे राहणारे आहेत.