महाराष्ट्र एटीएसकडून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक

वांद्रे परिसरातून घेतले एकाला ताब्यात

    30-Sep-2021
Total Views |

ATS_1  H x W: 0
मुंबई : दिल्ली पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना अटक करून दहशतवादी कारवाया करण्याचा मोठा डाव उधळून लावला. यामध्ये एका दहशतवाद्याचे मुंबईतल धारावी कनेक्शन समोर आले आणि महाराष्ट्र एटीएसने मुंबई पोलिसांनासह अनेक ठिकाणी छापे टाकले. या तपासादरम्यान मुंबईमधून दोन जणांना ताब्यात घेतले होते. तर, गुरुवारी सकाळी आणखी एका संशयित दहशतवाद्याला वांद्रे परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव हे मोहम्मद इरफान रहमत अली शेख असून तो ५० वर्षाचा आहे. नागपाडा येथील एटीएसच्या कार्यालयात त्याला चौकशीसाठी त्याला घेऊन जाण्यात आले. या संशयिताला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. शेख हा व्यवसायाने शिंपी आहे. त्याच्या घरातून ४ लाख रुपये जप्त केले आहेत. हे पैसे दहशतवादी कारवायांसाठी वापरण्यात येणार होते. त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून पैसे मिळाले होते ज्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असे एटीएसकडून सांगण्यात आले आहे.