शिक्षक दिना निमित्त होणार, रक्तदान शिबिराचे आयोजन

03 Sep 2021 18:22:50
 
teacher_1  H x
 
मुंबई : राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना, शिक्षक वर्गाने सामाजासाठी नवीन आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. ५ सप्टेंबर रोजी डॅा. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करतो. याच दिवशी आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करत असतो. "शिक्षक" हे स्थान प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत आदराचे, जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे आहे.
 
शिक्षक करत असलेल्या शिक्षण किंवा ज्ञान दानामुळे आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला एक साचेबद्ध अर्थ प्राप्त होऊन आपली जीवनघडी सुरळीत ठेवण्यात शिक्षकांचा मोठा हातभार किंवा सिंहाचा वाटा असतो .तद्वतच शिक्षक दिनी शिक्षण जसे जीवनाचा अविभाज्य भाग आहे तसेच "दानाचे" महत्त्व पाहता आज सद्य स्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच दैनंदिन जीवनात रक्तदानाचे महत्व खूप महत्वाचे आहे .
 
ज्ञानदान करून ज्याप्रकारे आपण पुण्य कमावतो व आयुष्याला कलाटणी मिळते त्याप्रमाणे रक्तदान करून आपण एखाद्याच्या आयुष्याला उभारी व उमेद देऊन जीवदान देऊ शकतो . तर "दाना" चे महत्त्व लक्षात घेता आज आपण शिक्षक जसे विद्यार्थ्यांना घडवत असतात तसे आपण प्रत्येक जण रक्तदान करून रक्ताची गरज भासणाऱ्याला जीवनदान देऊ शकतो. रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी माहीम येथील खालसा गुरुद्वारामध्ये अस्तित्व ट्रस्ट व आम्ही दादर मुंबईकर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.या कार्यक्रमाचे आयोजन सुनीता वाडकर, ऍड .सौ प्रज्ञा भिडे,सौ हिमानी दळवी, सौ शिल्पा वेंगुर्लेकर, श्री संतोष गवाणकर, श्री अमित चव्हाण ,सौ संगीता सुर्वे, श्री रूद्राक्ष बिर्जे, श्री नितिन पाटोळे केले आहे. के.ई.एम.रक्त पेढीच्या सहकार्याने होत आहे. अनेक इच्छुक रक्तदात्यांची त्यांच्या नावाची नोंद केली असून ज्या इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन अस्तित्व ट्रस्ट व आम्ही दादर मुंबईकर यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0