ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर नाशिकमध्ये बलात्कार; आरोपीने चाकूचा धाक दाखवून केला अत्याचार

28 Sep 2021 15:27:57
nashik _1  H x



नाशिक -
राज्यामध्ये महिला अत्याचाराची प्रकरण दिवसागणिक वाढत आहेत. साकीनाक्यामधील क्रूरपणे महिलेवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असताना नाशिकमधून खबळजनक घटना समोर आली आहे. ब्यूटी पार्लर चालणाऱ्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक नाशिकमध्ये समोर आली आहे. पार्लरमध्ये पूजा करत असताना दुकानात शिरुन आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवून व्यावसायिक महिलेवर बलात्कार केला.




नाशिकमध्ये पवननगर भागात पीडित महिलेचे ब्यूटी पार्लर आहे. आपल्या पार्लरमध्ये पूजा करत असताना संशयित आरोपी दुकानात घुसला. त्यानंतर आतून दरवाजा लावला. त्यावेळी बिथरलेल्या महिलेला आरोपीने चाकूचा धाक दाखवला. महिलेच्या तोंडात बोळा कोंबून, तिचे हात बांधून तिच्यावर जबरदस्ती केली. या अत्याचारानंतर महिलेने हिंमत करुन अंबड पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
 
 
हा आरोपी खुनाच्या गुन्ह्यात जेलमधून पॅरोलवर सुटला होता. त्यानंतर तो फरार झाला. पोलीसांकडून त्याचा शोध सुरु असतानाच त्याने बलात्काराचा गुन्हा केला. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली आहेत.
Powered By Sangraha 9.0