काय आहे पितृपक्षातील मातृ नवमीचे महत्व?

यंदा ३० सप्टेंबर २०२१ रोजी आहे मातृनवमी

    दिनांक  28-Sep-2021 17:40:43
|

matru navami _1 &nbs
मुंबई
: पितृ पक्षात दिवंगत माता, सव्वाष्ण महिला आणि अज्ञात हयात नसलेल्या महिलांचे श्राद्ध मातृ नवमीला होते. यंदाच्या वर्षी आश्विन कृष्ण नवमी, ३० सप्टेंबर रोजी मातृनवमी आहे. नवमीची तिथि २९ सप्टेंबर रात्री ८ वाजून २९ मिनिटांनी सुरू होऊन ३० सप्टेंबर रात्री १०.०८ वाजता समाप्त होणार आहे. तिथिची गणना सूर्योदयापूर्वीपासूनच होणार असल्याने मातृ नवमीचे श्राद्ध कर्म ३० सप्टेंबर रोजीच केले जाणे योग्य आहे.


भृगु संहिता विशेषज्ञ पं. वेदमूर्ति शास्त्री यांच्यानुसार, मातृ नवमीवर व्यक्तीला मातृ ऋण फेडण्यासाठी कालावधी योग्य आहे. पूजनासाठी स्नानानंतर सफेद रंगाचे वस्त्र धारण करावेत. पूजन स्थळापासून दक्षिण दिशेकडे एक चौकी ठेवून त्यावर सफेद वस्त्र अंतरावे. या आसनावर ज्या दिवंगत महिलेचे स्मरण करायचे आहे त्याचे चित्र किंवा कुठलीही प्रिय वस्तू ठेवून पूजा केली जाते.
काळ्या तीळाच्या तेलाचा दिवा लावून गंगा जल, तुळशीपत्र समर्पित केल्यानंतर गरुड पुराण, भागवत गीता अथवा गजेंद्र मोक्षाचा पाठ कले जातो. पाठ केल्यावर श्राद्धासाठी भोज्य पदार्थ घराबाहेर दक्षिण दिशेला ठेवले जातात. गाय, कावळा, मुंगी, चिमणी किंवा ब्राम्हणांच्या भोजनानंतर दिवंगतांच्या सेवेत राहिलेल्या चुकांसंदर्भात क्षमा याचना करायला हवी.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.