'झोजिला टनेल' : भारतीय अभियांत्रिकीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण

28 Sep 2021 15:09:30

Zojila_1  H x W
 
 
नवी दिल्ली : संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या श्रीनगर-लेह महामार्गावरील वाहतूक वर्षभर सुरू राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या 'झोजिला टनेल'च्या कामाची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी दि. २८ सप्टेंबर रोजी करणार आहेत.
 
 
श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, अतिशय प्रतिकूल हवामान, बर्फवृष्टी आणि वारंवार कोसळणाऱ्या दरडी यामुळे हिवाळ्यात जवळपास चार महिने हा महामार्ग पूर्णपणे बंद राहत असतो. मात्र, केंद्रीय परिवहन मंत्रालयातर्फे श्रीनगर-लेह महामार्गावरील 'झोजिला पास' येथे ११ हजार, ५७८ फूट उंचीवर १४.१५ किमी लांबीचा आणि दुपदरी 'झोजिला टनेल'चे काम सुरू आहे. या बोगद्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लेह यांच्यादरम्यान वर्षभर वाहतूक सुरू राहणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, हा बोगदा आशिया खंडातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे.
 
 
'झेड मोड ते झोजिला'दरम्यानच्या १८.४७५ किमीच्या महामार्गाचा विकास आणि विस्तार करण्यात येत आहे. दुसऱ्या भागामध्ये 'झेड मोड टनेल'चा समावेश आहे. दुसऱ्या भागामध्ये ३.०१८ किमी महामार्गाचाही विस्तार करण्यात येणार आहे, तर १३.८४२ किमीचा भाग नव्याने विकसित करण्यात येत आहे. या भागामध्ये दोन 'ट्वीन ट्यूब टनेल' असणार आहेत. पहिला 'ट्वीन ट्यूब टनेल' ४३५ मीटर, तर दुसरा टनेल १,९५० मीटर लांबीचा असणार आहे. यामध्ये प्रत्येकी ३०० मीटर लांब असे पाच पूल असणार आहेत. त्याचप्रमाणे बर्फवृष्टीमुळे निर्माण होणारे अडथळे टाळण्यासाठी ३०० आणि १५० मीटर लांब 'स्नो गॅलरी'देखील बांधण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0