ठाणे : महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना एक वर्षाच्या आत फाशीची कठोर शिक्षा द्या या मागणीसाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे शहरतर्फे स्वाक्षरी मोहिम सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या जिल्हा अध्यक्षा पल्लवी जगताप यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस ठाणे शहरवतीने ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर सह्यांची मोहीम राबविली.
गृहनिर्माण मंत्री डॅा.जितेंद्र आव्हाड मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे,ठामपा गटनेते नजिब मुल्ला, संघर्ष महिला संघाच्या सौ.रूता आव्हाड विरोधी पक्ष नेते अशरफ(शानू)पठाण,जेष्ठ नेते सय्यद अली भाई महिला अध्यक्षा सुजाताताई घाग,कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांच्या सहकार्याने सदरची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्वाक्षरी मोहिमेत कळवा-मुंब्रा विधानसभा अध्यक्षा पुजा शिंदे,मानपाडा-माजिवाडा ब्लॅाक कार्याध्यक्षा अश्विनी वैद्य,चेंदणी कोळीवाडा विभाग अध्यक्षा नंदिनी मुदालिया,कळवा ब्लॅाक अध्यक्षा श्रुती कोचरेकर,पुजा दामले ,सोनी चौहान,विद्या पाटिल,सिमा बडदे,तमन्ना अशरफी,नूरी खान,मनिषा बोडगे,सुरक्षा रायात आदींसह युवती सहभागी झाल्या होत्या.