रा. स्व. संघाबद्दल केलेल्या वक्तव्यावर जावेद अख्तरला न्यायालयाचा दणका

28 Sep 2021 12:54:50

Javed Akhtar_1  
 
 
ठाणे : सध्या बॉलीवूडचे प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर हे चांगलेच चर्चेत आहेत. आधी कंगनासोबत झालेल्या वादामुळे त्यांना न्यायालयाची दारे ठोठावी लागली. तर, आता रा. स्व. संघाबद्दल अक्षेपार्ह्य वक्तव्य केल्यामुळे न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. एवढेच नव्हे तर अनेकवेळा त्यांनी केलेली व्यक्तव्ये ही वादग्रस्त ठरली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांची विचारसरणी तालिबानसारखीच असल्याचे वक्तव्य केले होते.
 
 
 
जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही तालिबानशी केली होती. या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात ठाण्यातील न्यायालयामध्ये खटला दाखल केला. यावर न्यायालयाने जावेद अख्तर यांना कारणे दाखवा अशी नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0