मोदींनी अमेरिकी उपराष्ट्रपतींना दिली 'ही' भेट; हॅरिसना आठवले आपले भारतातले कुटुंब

24 Sep 2021 20:00:51
america_1  H x


वाॅशिंग्टन -
आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना अनोखी भेट दिली. पंतप्रधान मोदींनी लाकडी चौकटीत सजवलेली कमला हॅरिस यांचे आजोबा पीव्ही गोपालन यांची सरकारी नेमणूक आणि सेवानिवृत्तीबाबतचे राजपत्र त्यांना भेट म्हणून दिले.
 
 
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती हॅरिस यांचे आजोबा पीव्ही गोपालन हे एक वरिष्ठ आणि आदरणीय सरकारी अधिकारी होते. ज्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत असताना अनेक पदांवर काम केले होते. कमला हॅरिस त्यांच्या आई -वडिलांसोबत भारत सोडून लहानपणी अमेरिकेत गेल्या होत्या. हॅरिस यांनाही पंतप्रधान मोदींकडून भेटवस्तू मिळाल्यानंतर त्यांचे आजोबांसोबतचे बालपण आठवत असेल. याशिवाय पंतप्रधानांनी कमला हॅरिसला गुलाबी मीनाकरी असलेला बुद्धिबळ संच देखील भेट दिला. गुलाबी मीनाकारीची कला जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक, तसेच पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघाशी संबंधित आहे. या बुद्धिबळ संचाचा प्रत्येक तुकडा काळजीपूर्वक हाताने तयार केलेला आहे. यामध्ये काशीच्या चैतन्याची झलक दिसते.
 
 
पंतप्रधान मोदींनी जपानच्या पंतप्रधानांना चंदनापासून बनवलेली बुद्ध मूर्ती भेट दिली. पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांना चंदनाची बुद्ध मूर्ती भेट दिली. जपानमध्ये सहाव्या शतकापासून बौद्ध धर्माचे पालन केले जात आहे. तसेच, भारत आणि जपान यांना एकत्र आणण्यात बौद्ध धर्माची मोठी भूमिका आहे. जपानच्या दौऱ्यादरम्यान पीएम मोदींनी बौद्ध मंदिरांना भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. संभाषणादरम्यान उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रिय आहेत आणि या संदर्भात त्यांनी पाकिस्तानला त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0