द्विपक्षीय नव्हे, जागतिक प्रश्नांवरही भारत – अमेरिका मजबुत भागिदार; - डॉ. विजय चौथाईवाले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2021
Total Views |
vc_1  H x W: 0

पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याचे जागतिक महत्व
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : भारत आणि अमेरिकेचे केवळ द्विपक्षीय प्रश्नांविषयी रणनितीक संबंध नसून जागतिक प्रश्नांवर दोन्ही देश परस्परांचे मजबुत भागिदार आहे, असा संदेश पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातून संपूर्ण जगाला मिळाला आहे; असे प्रतिपादन भाजपच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय चौथाईवाले यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत केले.
 
 
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी आणि परराष्ट्र विभाग प्रमुख डॉ. विजय चौथाईवाले यांनी पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याविषयी संयुक्त पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी डॉ. चौथाईवाले यांनी पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याचे महत्व विषद केले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या सात वर्षांच्या काळात अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांसोबत भारताचे संबंध अतिशय सलोख्याचे राहिले आहेत. पंतप्रधानांच्या सध्या सुरु असलेल्या अमेरिका दौऱ्याचे महत्व केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते जगासाठीदेखील आहे. भारत आणि अमेरिका संबंध हे केवळ द्विपक्षीय मुद्द्यापुरते मर्यादित नसून सध्याच्या सर्व जागतिक प्रश्नांवर दोन्ही देश परस्परांचे मजबुत भागिदार आहेत, हा संदेश जगाला या दौऱ्यामुळे प्राप्त झाला आहे.
 
 
अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासोबतची पंतप्रधानांनी चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचे डॉ. चौथाईवाले यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, दोन्ही नेत्यांनी नेहमीचा प्रोटोकॉल बाजुला सारून बैठक सुरु होण्यापूर्वीच संयुक्त निवेदन दिले. त्यानंतर दोघा नेत्यांच्या बैठकीत पाकिस्ताननिर्मित दहशतवादाविषयी सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे भारत आणि अमेरिका या दोघांना त्रास होईल, अशा कोणत्याही दहशतवादी कृत्यास पाकने पाठिंबा देऊ नये; असे स्पष्ट वक्तव्य हॅरिस यांनी केले आहे. त्यामुळे दहशतवादाच्या मुद्द्यावर भारत – अमेरिकेचे समान धोरण असल्याचे स्पष्ट झाल्याचे डॉ. चौथाईवाले यावेळी म्हणाले.
 
 
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेतील आघाडीच्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. त्यांची निवड अतिशय विचारपूर्वक केल्याचे डॉ. चौथाईवाले यांनी नमूद केले. ‘क्वालकाम’ या ५ जी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे सीईओ ख्रिस्तियानो एमोन, ‘एडोबचे’ शंतनू नारायण, ‘फर्स्ट सोलर’ या सौरउर्जा क्षेत्रातील कंपनीचे मार्क विड्मर, ड्रोननिर्मिती करणाऱ्या ‘जनरल ऑटोमिक्स’चे विवेक लाल आणि ‘ब्लॅकस्टोन’ या बँकींग क्षेत्रातील कंपनीचे सीईओ स्टेफन श्वार्झमन यांचा त्यात समावेश होता. या सर्व कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचेही स्पष्ट झाल्याचे डॉ. चौथाईवाले यांनी यावेळी नमूद केले.
 
 
त्याचप्रमाणे ‘क्वाड’ राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेमध्येही पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. यामध्ये अफगाणिस्तानच्या संदर्भात कट्टरतावाद – दहशतवाद, द. चिनी समुद्र आणि हिंद – प्रशांत महासागर क्षेत्रातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्याचवेळी ‘नाटो’ आणि ‘क्वाड’ यांची तुलना करणे योग्य नसल्याचे डॉ. चौथाईवाले यांनी म्हटले. ‘नाटो’ आणि नुकतीच उदयास आलेली ‘अकुस’ या आघाड्या संरक्षणविषयक आहेत. मात्र, ‘क्वाड’ अतिशय व्यापक संकल्पना असून त्यामध्ये हवामानबदल, करोना, लस, दहशतवाद हे मुद्दे प्रमुख आहेत. अर्थात, त्यामध्ये निश्चितच आवश्यक त्या सुरक्षाविषयक मुद्द्यांचाही समावेश असल्याचे डॉ. चौथाईवाले यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
 
 
चीन ‘मिनी लेहमन मुव्हमेंट’ घडण्याच्या उंबरठ्यावर
 
 
चीनमध्ये सध्या आर्थिक संकट उभे राहिले आहे. तेथील सर्वांत मोठी बांधकाम क्षेत्रातील कंपनी सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे. या घटनेचे वर्णन अनेक जण ‘मिनी लेहमन मूव्हमेंट’ असे करीत आहेत. कारण, अमेरिकेमध्येही २००८ साली लेहमन ब्रदर्सच्या दिवाळखोरीमुळे अर्थसंकट आले होते, सध्या तशीच स्थिती चीनमध्ये घडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘ब्लॅकस्टोन’ या बँकींग क्षेत्रातील कंपनीने भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवून गुंतवणूक करण्याची तयारी दाखविणे हे भारताचे मोठे यश असल्याचे डॉ. चौथाईवाले म्हणाले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@