दिल्लीतील न्यायालयात गोळीबार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2021
Total Views |

Delhi_1  H x W:
 
नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी न्यायालयात झालेल्या गोळीबारात कुख्यात गँगस्टर जितेंद्र मान उर्फ गोगी याची हत्या करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून दिलेल्या प्रत्युत्तरात गोळीबार करणारे दोन्ही गुंडही ठार झाले आहेत. टोळीयुद्धातून ही घटना घडली आहे.
 
दिल्लीतील रोहिणी न्यायालयात शुक्रवारी सकाळी कुख्यात गँगस्टर गोगी यास तिहार तुरुंगातून सुनावणीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी दोन गुडांनी न्यायाधीशांसमोर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात गोगी याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्रत्युत्तरात गोळीबार करणारे दोन्ही गुंडही ठार झाले आहेत. दोन्ही गुंडांना ठार करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपयांचे बक्षिस दिल्लीच्या पोलिस आयुक्तांनी जाहिर केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@