सावरकरांनी व्यक्त केला होता कट्टरपंथी इस्लामच्या उदयाचा अंदाज

22 Sep 2021 15:55:19

RSS_1  H x W: 0


`वीर सावरकर-दि मॅन हू कुड हॅव प्रिव्हेन्टेड पार्टिशन’या पुस्तकाचे सरसंघचालकांच्या हस्ते होणार प्रकाशन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक उदय माहूरकर आणि सह-लेखक चिरायू पंडित यांनी लिहिलेले तसेच रुपा पब्लिकेशन्स प्रकाशित `वीर सावरकर-दि मॅन हू कुड हॅव प्रिव्हेन्टेड पार्टिशन’या पुस्तकाचे प्रकाशन १२ ऑक्टोबर २०२१ या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हस्ते दिल्ली येथे होत आहे.
 
 
 
भारताला ज्या राष्ट्रीय सुरक्षासंबंधी समस्या भेडसावत आहेत, त्याचा अंदाज स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चीन, पाकिस्तान आणि आसाममधील समस्येविरूद्धच्या युद्धापासून वर्तवला होता. त्यांनी कट्टरपंथी इस्लामच्या उदयाचा अंदाज लावला होता आणि आज भारताला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दूरदर्शीपणे भारताच्या वर्तमानातील ज्या राष्ट्रीय सुरक्षा समस्यांची कल्पना केली होती त्याबद्दल लिहिले आहे. सावरकर हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि मुत्सद्देगिरीचे दूरदर्शी होते, याबाबतचे विश्लेषण या पुस्तकात केले आहे.
 
 
 
सावरकरांनी १९४७ ची भारताची फाळणी कशी रोखण्याचा प्रयत्न केला याचे दस्तऐवजीकरण करणारे पुस्तक, जे सावरकरांचे गंभीरपणे मूल्यमापन करते. फाळणी टाळण्यासाठी त्यांनी अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केले, याबाबतही उल्लेख आहे. सावरकरांनी चीनशी युद्धाचे ८ वर्ष आधी भाकीत केले होते आणि नेहरूंना फाळणीनंतर भारताला अणुबॉम्बने सज्ज करण्याचा सल्ला दिला होता. पण कारण आम्ही त्याचे ऐकले नाही, आम्हाला प्रगतीसाठी २५ वर्षांहून अधिक काळ लागला पण तोपर्यंत चीनने आम्हाला उडी मारून मागे टाकले होते,असे उदय माहूरकर यांनी या पुस्तकाबाबत म्हटले आहे.


Powered By Sangraha 9.0