चार धाम यात्रेसाठी भारतीय रेल्वेची विशेष ट्रेन; सर्व सोयीसुविधांसह इतकी आहे किमंत

22 Sep 2021 16:29:55
train _1  H x W



दिल्ली -
भारतीय रेल्वेने अलीकडेच 'देखो अपना देश' या कार्यक्रमांतर्गत चार धाम यात्रेसाठी एक विशेष डिलक्स एसी पर्यटक ट्रेन सुरू केली आहे. 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'ने (IRCTC) सुरू केलेली ही विशेष ट्रेन १६ दिवसांमध्ये भारतामधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे दर्शन पर्यटकांना करुन देईल.
 
 
 
चार धाम यात्रेेचा हा दौरा दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकापासून सुरू होणार आहे. त्यानंतर ऋषिकेश, जोशीमठ, बद्रीनाथ, पुरी, रामेश्वरम, द्वारका करुन तो पुन्हा दिल्ली येऊन संपेल. पर्यटकांना गंगा आरती पाहण्याची आणि लक्ष्मण झूला, त्रिवेणी घाट, रामजन्मभूमी, हनुमान गढी, सरयू आरती, नंदीग्राम, काशी विश्वनाथ मंदिर, जगन्नाथ मंदिर, गोल्डन बीच, कोणार्क सूर्य मंदिर, चंद्रभागा बीच, रामनाथस्वामी मंदिर यासारख्या लोकप्रिय स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. याशिवाय धनुष्कोडी, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, शिवराजपूर बीच आणि बेट द्वारकाही पाहता येईल.
 
 
 
५०० किमी पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या चार धाम यात्रा टूर पॅकेजमध्ये अत्याधुनिक डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेन आहे. ज्यात दोन उत्तम जेवणाचे रेस्टॉरंट्स, एक आधुनिक स्वयंपाकघर, शॉवर क्यूबिकल, आधुनिक वॉशरूम, पाय मालिश आणि बऱ्याच काही सुविधा आहेत. दोन प्रकारची निवास व्यवस्था उपलब्ध असून जी फस्ट क्लास एसी आणि सेकेन्ड क्लास एसी आहे. प्रत्येक डब्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांसारखी सुरक्षा ही वैशिष्ट्ये प्रवास सुरक्षित करणार आहेत. या दौऱ्यामध्ये फक्त शाकाहारी जेवण दिले जाईल. या दौऱ्याची किंमत फस्ट क्लास एसी तिकिटासाठी १ लाख ९ हजार ५९५ रुपये आणि सेकेन्ड क्लास एसी तिकिटासाठी ९० हजार ९८५ रुपये आहे. हा दौरा १७ आॅक्टोबर रोजी सुरू होईल.
 
 
 
नियम आणि अटी
१ ) १८ वर्षांवरील सर्व प्रवाशांनी कमीतकमी कोरोनाची एक लस घेणे आवश्यक आहे.
२) आयआरसीटीसी नैसर्गिक आपत्ती, स्ट्राइक, ट्रेनचा विलंब इत्यादींसह अप्रत्याशित परिस्थितीनुसार प्रवासात बदल करू शकते.
Powered By Sangraha 9.0