आयुष्यभर ज्या एसटीमध्ये सेवा बजावली त्याचा एसटीत घेतला गळफास

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने हादरला महाराष्ट्र

    दिनांक  21-Sep-2021 14:29:59
|
ST_1  H x W: 0
 
 
 
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी बसच्या चालकाने बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये हा प्रकार घडला असून या घटनेने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे. मृतक बस चालकाचे नाव सुभाष तेलोरे असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच आधीच एसटी कर्मचारी आणि त्यांचे वेतन यावरून गेले अनेक दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद चालू होते. या आत्महत्येने पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बसचे चालक सुभाष तेलोरे यांनी अहमदनगरमधली संगमनेर बस डेपो येथे एसटी बसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवलं. पहाटेच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. पाथर्डी - नाशिक या बसचे ते चालक होते. संगमनेर बसस्थानकात डिझेल नसल्यानं नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. त्यावेळी पहाटेच्या सुमारास त्यांनी कपड्याच्या सहाय्याने बसमध्ये गळफास घेतला. ते पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावातील निवासी होते. त्यांच्यावर कर्ज होते आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.