गजब बेज्जती है! मै जहाँ इंटरव्ह्यू करता हूँ ओवेसी आता है!

सुरेश चव्हाणकेंनी केली ओवेसींची कुत्र्याशी तुलना

    दिनांक  20-Sep-2021 14:25:27
|

suresh chawan ke _1 सुरेश चव्हाणकेंनी केली ओवेसींची कुत्र्याशी तुलना

 
 
मुंबई : कथित शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टीकैत यांची मुलाखत 'सुदर्शन' वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी घेतली. यावेळी कृषी आंदोलनातील प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. मात्र, ही संपूर्ण मुलाखत गाझापूर-उत्तर पदेश-दिल्ली सीमेवर घेण्यात आली. शेतकरी आंदोलनस्थळी घेण्यात आलेल्या या मुलाखतीत टीकेत आणि चव्हाणके संवाद साधत असताना दोन कुत्रेमध्ये आले. मात्र, प्रसंगावधान राखत चव्हाणके यांना म्हटले की, मी कुठलीही मुलाखत घ्यायला जातो तेव्हा ओवेसीमध्ये येतो, असे म्हणत त्यांनी खासदार ओवेसींवर टीका केली.
 
चव्हाणके म्हणाले, "माझ्या प्रत्येक मुलाखतीत ओवेसीची एण्ट्री होते. आपण कुठल्याही मुलाखत घेतो तेव्हा तो येतो. या दोघांचीही (कुत्र्यांची) मी माफी मागतो कारण तो प्राणी इमानदार असतो. इथे डुक्कर यायला हवा होता पण कुत्रे आले." त्यावर टीकेत यांनीही हसत कुत्रा इमानदार प्राणी असतो, असं म्हटलं. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.