मुंबई - मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टाने रविवारी सांगितले की, पैशांच्या व्यवहारावरुन प्रथमदर्शनी लक्षात येते आहे की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि त्याचे सहकारी कुंदन शिंदे यांच्याकडून ४.७ कोटी रुपये मिळाले आहेत. मनी लाँडरिंगच्या एका प्रकरणात वाझे आणि इतरांविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने ही टिप्पणी केली.
कोर्टाने नमूद केले की, "स्टेटमेंट्च्या अवलोकनाने आणि पैशाचा व्यवहार दर्शेवते की, अनिल देशमुख यांना सचिन वाझे आणि कुंदन शिंदे यांच्याकडून ४.७ कोटी मिळाले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी ही रक्कम ऋषिकेश देशमुख यांच्या सूचनेनुसार सुरेंद्र जैन आणि विरेंद्र जैन यांना ‘हवाला’ व्यवहारांव्दारे हस्तांतरित केली. देशमुख यांच्या मालकीच्या श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. पीएमएलए अंतर्गत आरोपींविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेशी प्रथमदर्शनी कारणे आहेत, असेही न्यायालयाने नमूद केले. हृषीकेश देशमुख हा अनिल देशमुख यांचा मुलगा आहे.
अलिकडच्या काळात या प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. सचिन वाझे यांनी अंमलबजावणी संचालनालयाला सांगितले की, अनिल देशमुख यांना टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक करण्याची इच्छा होती.
सचिन वाझे यांनी ईडीसमोर सादर केले आहे की, त्याने पोलीस सेवेत पुन्हा रुजू होण्यासाठी त्याने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना २ कोटी रुपये दिले होते. त्यांनी असेही उघड केले की, अनिल देशमुख त्यांना वैयक्तिकरित्या त्यांच्या कार्यालयात किंवा घरी बोलावून विविध प्रकरणांची माहिती देत असत. यामध्ये टीआरपी हेराफेरी प्रकरण, अर्णब गोस्वामीशी संबंधित प्रकरण, दिलीप छाब्रिया प्रकरण आणि सोशल मीडिया बनावट फाॅलोवर या प्रकरण यांचा समावेश आहे.