६ चेंडू ६ षटकार... ऐका युवीची जुबानी !

20 Sep 2021 16:59:43

Yuvraj Singh_1  
 
 
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने २००७मध्ये केलेल्या ६ षटकारांची कामगिरी अजूनही क्रीडाप्रेमींच्या मनात अजूनही ताजी आहे. १९ सप्टेंबर रोजी या पराक्रमाला १४ वर्षे पूर्ण झाली. युवराज सिंह टी -२० सामन्यात ६ चेंडूत ६ षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला होता. गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीचा त्याने चक्काचूर केला होता. युवराजने हा अविस्मरणीय क्षण पुन्हा एकदा घडवला आहे. त्याने मजेदार पद्धतीने एक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.
 
 
 
 
 
युवराजने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये स्टुअर्टच्या षटकात ६ चेंडूंमध्ये लावलेले ६ षटकार दाखवले आहेत. त्याआधी एंड्रयू फ्लिंटॉफसोबतचा वाद त्याच्या स्वतःच्या शैलीत दाखवला आहे. एंड्रयू फ्लिंटॉफच्या षटकात युवीने दोन चौकार मारल्याने तो चिडला होता. षटकाच्या शेवटी दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. युवराजने आपल्या व्हिडिओमध्ये ही घटना दाखवली आहे. मात्र, यावेळी त्याने गाडीचे हेल्मेट घातले आहे. यात धोनीची आणि स्टुअर्ट ब्रॉडचा अभिनयही त्याने केला आहे. सध्या सोशल मिडीयावर याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0