सिद्धार्थ शुक्लाचं अखेरचं ट्विट चर्चेत... म्हणाला होता...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Sep-2021
Total Views |

Maha MTB _1  H





मुंबई :
बिग बॉस सीझन-१३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. तो ४० वर्षांचा होता. हृदयविकारानंतर त्याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, रात्री उशीरा त्याने उशीरा काही औषधे घेतली होती. त्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडत गेली होती.
 
 
सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी त्याने एक ट्विट केले होते. त्याच्या मृत्यूनंतर हे ट्विट पुन्हा चर्चेत आले आहे. २३ जुलै रोजी म्हणजे आजपासून ४० दिवसांपूर्वी तो म्हणाला होता की, "नाम करो तो इतका करो की, तुम्हे हराने की कोशिश नहीं साजीश की जाए" आयुष्यात एवढं नाव कमवा की, तुम्हाला हरविण्यासाठी प्रयत्न नाही तर कट कारस्थान रचली जातील. सिद्धार्थच्या एका फॅनने १० ऑगस्ट रोजी त्याच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त केली होती. सिद्धार्थ तुम्ही फिट नाही आहात, त्यावर सिद्धार्थने उत्तरही दिले होते की, मी गोळ्या घेत असल्याने माझं वजन वाढत चालले आहे.
 
 
सिद्धार्थच्या अफेअर्सचीही झाली होती चर्चा
 
 
अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि शहनाजसह त्याचे नाव जोडलं गेलं होते. 'भाभीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री 'अंगूरी भाभी'चे पात्र साकारणाऱ्या आणि 'बिग बॉस ११'च्या विजेत्या शिल्पा शिंदेनेही दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थ शुक्लाबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. सिद्धार्थसह २०११ पासून रिलेशनमध्ये असल्याचे तिने म्हटले होते.



त्याबद्दल एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. हे नातं पुढे टीकवायचं की थांबायचं, असा हा संवाद होता. भांडण तंट्यानंतर ही चर्चा झाल्याचे शिल्पाने म्हटले होते. मला चालत्या गाडीतून बाहेर फेकलं होतं माझा छळ करायचा, असाही आरोप शिल्पाने केला होता.
 
बिगबॉस-१३ मध्ये त्याची सहकलाकार असलेल्या शहनाज गिलसह तिचे नाव जोडले जात होते. या कार्यक्रमात त्यांच्या अफेअरबद्दलही चर्चा सुरू झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर शाहनाजनेही सिद्धार्थ तिला पसंत असल्याचे म्हटले होते. सिद्धार्थने कधीही या नात्याचा स्वीकारही केला नाही आणि याबद्दल नकारही दिला नाही.










@@AUTHORINFO_V1@@